घटना
पालघरची.. बघा नुसतं
पालघर म्हटलं तरी
जवळपास सर्वांना समजलेही असेल
घटनेबद्दल.. काय झालं
हो नक्की ... "गैरसमजातून
झालाय म्हणे.." गैरसमज..? हा असा
जिवंत माणसांना ठेचून
मारण्याएवढा कसा राहू
शकतो.. त्यात ते मारहाण
करणारे अल्पवयीन आहेत म्हणे...
अहो डोळ्यासमोर गोळ्या
झाडणाऱ्या कसाबला आम्ही एवढ्या
दिवस पोसलं.. आणि
आपल्याच लोकांबद्दल हे असं
घडलंय आता.. खरतर
लोकांची मानसिकताच कळत नाहीये
मला.. कुठून येत
पोरांमध्ये एवढं बळ
? इतकी चीड ? मार-मार
मारायला लावणारी ही पशुवृत्ती
? "चार चापटी मारल्या ना.
मग आता बस्स
!!" असंही साधं का
वाटलं नाही त्या
'कोवळ्या' मनांना... अ...खरंच
, मन कोवळं राहीलय
का पण.. ? हो... हो.. या
वयातही... खरंतर याही पेक्ष्या जास्त
कोवळ्या मनाचे असल्यापासूनच आम्ही
सर्व movies बघायला
लागलो (सिनेमा म्हणणे म्हणजे
'गावंडळ' पणाचे लक्षण वाटायला
लागलेय आजकालच्या पोरांना म्हणून
movies ). म्हणजे आतातर ती सवयच
जडलीय आम्हाला movies बघायची
.. त्याही असल्या 'टाम-तुम'
नाही.. फुल्ल टू अकशन
धमाका..!!! "एक बार
जब मैने कंमेण्टमेण्ट
कर दी तो
फिर मैं अपने
आपकी भी नही
सुनता.." असल्या गोष्टींचा जास्त
अतिरेक झाला कि
मग ... त्याच डायलॉग मधल्या
'आप' ची जागा
'बाप' शब्द कधी
घेतो ते लक्षातही
येत नही मग..
छे.. काळजात अजिबात कळ उठत नही आता.. कोणी.. कोणाला..कितीही रक्तबंबाळ होईस्तोवर मारलं तरी.. सपा-सप वार करून समोरच्या दहा-पंधरा लोकांचे देह कपात सुटणारा हिरो म्हणजे ग्रेटच..!!! साऊथच्या movies चा तर एक शब्दही कळत नाही... तरी बघतो तो movie ..ते फक्त यासाठीच ! खटकन घोडा ओढून गोळी डायरेक्ट डोक्यातून आरपार निघून गेली की हिरो व्हावस वाटतं. आराम खुर्चीवर बसल्या बसल्या रक्त सळसळायला लागत... धिशक्यावं-धिशक्यावं करत विरोध करू पाहणाऱ्याला आडवं पाडावंसं वाटतं. सोफ्यावर बसून मम्मी-पप्पाही बघत असतात आमच्यासोबत .. 'त्याच्या'मुळे त्यांनाही आवडतो हा खूनखराबा.. म्हणजे आवडून घ्यावा लागतो त्यांनाही आता.. नाहीतर 'त्याच्या'तल्या भाईला जाग येण्याची भीती आता घरातल्यांनाही वाटते... नक्की घडतंय तरी काय ? नुसत्या गैरसमजातून मारून मारून जीव घेतला गेला... अजूनही विश्वास पटत नाहीये .. कितीतरी लोक असतील.. कुणालाही यांना थांबवता आलं नाही ? कुणी प्रयत्न तर केला असेल ? की प्रयत्न आम्ही फक्त विडिओ शूटिंग काढून 'सबसे तेज' याला त्याला पाठवून कॉलर टाईट करण्यापुरताच करतो.. घटना घडून गेल्यावर 'संतप्त' होणारे घटना घडत असताना सजीवांच्या कॅटेगिरीतही नसतात का..?? कुठेतरी बदल घडून यायला हवाच. एक मात्र नक्की .. सिनेमांमध्ये दाखवला जाणारा अवाजवी हिंसाचार या घटनेच्या मुळाशी आहे.. अजूनही बऱ्याच गोष्टींच्या खोलात जाऊन सरकारने योग्य तपास आणि कठोर शिक्षा करायला हवी.. किमान यापुढे असा कुणाचा मौल्यवान जीव ना जावो त्यासाठी तरी....
*********************************************************************************
रात्रीची वेळ... शहरातल्या मोक्याच्या ठिकाणचा रोड... रस्त्याच्या कडेला एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला.. शेजारीच कोलमडलेली टू व्हिलर.. मदतीसाठी तो जोरजोरात ओरडतोय... जाणारे येणारे मात्र ऐकल्या न ऐकल्यासारखं करताहेत.. काही जवळ-जाऊन अॅक्सिडेंटच्या भयानकतेचा ‘तर्क’ लावताहेत. काही आता हा काही जगत नाही असं शिक्कामोर्तब करताहेत. तो मात्र घसा फोडून रावण्या करतोय. मदत मागतोय... पण एकही मदतीला पुढे नाही... “चला हो, उगाच पोलिसांचं लच्चांड आपल्याच मागे लागेल”- अशी मौल्यवान माहिती पुरवून मदतीला धावणाऱ्या नवऱ्याला वेळीच आवरणाऱ्या बायकोचीही ‘स्तुती’ करावी तेवढी कमीच... असाच कितीतरी वेळ निघून जातो... मग एखाद्या ‘गुमनाम’ व्यक्तीच्या कळवण्यामुळे पोलिस येतात.. तो पर्यंत त्याने जीव सोडलेला असतो... मग अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करणं वगैरे वगैरे कार्यक्रम सोईस्कररित्या पार पडतात.. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये मोडलेल्या गाडीच्या फोटोसह इनसेटमध्ये मृत व्यक्तीचा फोटो छापला जातो.. आदल्या दिवशी मदतीला न धावणारे ती बातमी मात्र मन लावून वाचतात.. अगदी पुढील तपास हवालदार टिंबटिंब करत आहेत इथपर्यंत... वाचल्यावर प्रतिक्रियाही तशीच... “बघ गं... मी तुला कालच म्हणालो होतो ना, हा जगणार नाही म्हणून... बघ.. बघ.. तो मेलाचा..!!!”

तो.. चोर.. चोर म्हणजे तसा नवीनच.. सराईत गुंड वा भाई नाही.. नोकरी पाणी नाही म्हणून नेटकाच या धंद्यात जॉईन झालेला... अनुभव शून्य... त्यामुळे पहिल्याच ‘अटेम्प्ट’मध्ये अपयशी झाला.. मग जीव जाईपर्यंत पळालाही पण पब्लिक सोडणार थोडीच ! बस, ट्रेन वेळेवर पकडण्यासाठी त्यांचीही रनिंग बीटवीन द व्हिकेट कोहलीसारखीच सुधारलीय. पळणारा पकडणे तर त्यांच्या ‘बाये हात का खेल.’ पकडल्यावर मग वेळ पब्लिक पडीची.. मग भपकेदार समाजसेवक असो, नुकतंच कॉलेजला रुळलेल्या पोरांचं टोळकं असो वा आताच शेंबूड पुसून आलेलं कार्ट असो.. सर्वच आपापलया परीने हात साफ करून घेतात... कधी मुस्कटात, कधी पोटात, कुठेही, कसेही दे-दणादण दणके देतात... त्याच्या नाकातून ओठातून रक्त.. निसटलेल्या बरगड्या.. चुरगळलेल्या आतड्या...एकीकडे चोराचं विव्हळणं दुसरीकडे बाकीच्यांच चोपणंही चालूच.. आसपास लेडीज जमा झाल्यावर तर मारणाऱ्यांना आणखीनच ऊत.. अजूनच जोरात लाथाळी-बोखाळी... तोंडातून तर चोरालाही लाज वाटावी एवढ्या घाणेरड्या शिव्यांचा सपाटा... इकडे कडेवरच्या पोरापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच मुकाट.. गप्प... फुकटातला तमाशा पहात.. हाताची घडी तोंडावर बोट. मग मारून मारून सर्वच दमल्यावर नागरिकांच्या सेवकांची जोरदार एन्ट्री. एकदम जीपबाहेर येणारी खाकीतली ती ‘खाकी’ गँगच... आल्याआल्या फुकटातल्या सरकारी बुटाचा चोराच्या तोंडावर शिक्का.. मग पुढची विचारपूस... नंतर चोराच्या छातीवर पाय ऊन स्टाईलमध्ये पंचनामा वगैरे... शेवटी तावातावातच लाथाळतच चोराची जीपमध्ये रवानगी.. गाडी निघेपर्यंत इकडे समाजसेवकांची, पोरांची शिव्यांसह निरर्थक. टयाँव टयाँव सुरूच... मग सर्व किस्सा निल झाल्यावर संध्याकाळी पोरा-पोरांमध्ये कोणी जास्त मारलं यावरून कट्ट्यावर वादावादी..

“ओ...ताई! भाजी-भाकरी द्या हो.. ओ..., ताई....” घराबाहेर केव्हाची फाटक्या फ्रॉकमधली चिमुरडी घसा फाटोस्तर ओरडतेय... हातात रिकामं बघुलं अन काळवंडलेली पिशवी घेऊन. घरातली ‘लक्ष्मी’ मात्र टीव्हीसमोर तोंड घेऊन बसलीय.. दररोजचाच तोच तो सासू-सुनेचा तमाशा पाहण्यात ती आजही गुंतून गेलीय.. एकीकडे नेटकंच शाळेतून आलेलं पोरगं भर ताटात हात धुतंय... तर त्याहून लहान गुडघ्यावर रेंगाळत रेंगाळत बाटलीतल्या दुधाने आख्खं घर

माखवतंय..
बाहेर त्या पोरीच्या
आरोळ्याही चालूच आहेत... तिला
फक्त प्रतिसाद देताहेत
ते
तिच्याच खपाटीला गेलेल्या पोटातले
कावळे... बस्स!... बाकी सर्वच
शांत... शेजारचे... रस्त्यावरून जाणारे...
अगदी कंपाऊंडमधले आणि
बाहेरचे कुत्रेही... कारण त्यांनाही
तिच्या ओरडण्याची आता सवयच
झालीय...!!!

You put todays all truth in word.....
ReplyDeleteLet all of think by this way...this change will come in truth soon...let we will try from ourself....👌👌👍👍
yes right...
Deleteअप्रतिम शब्दांची मांडणी ��
ReplyDeleteखूप छान लिहिलंय
ReplyDelete