आपला देश... सॉरी 'माझा' (शाळेत असतानाच असं म्हणायला सांगितलं होतं.. पण का?
नेमकं हेच समजावता आलं नाही त्यांना.) हं... तर माझा देश म्हणाल तर तसाच आहे अजूनही... अॅक्चुअली जे आहे त्यात आम्ही सुखी
असतो.. आणि आमचा (सॉरी माझा) देशही... एकूणच आम्ही सारे 'समंजस'..!!! परराष्ट्राच्याही भावना समजतात आम्हाला. आम्ही जास्तीत जास्त 'निषेध’ करतो. मेणबत्त्याही
पेटवतो. वर्षानवर्षे केस चालवतो. मग आपल्या घरच्यांवरच का रागवायचं (हा आमचा
सूक्ष्म विचार). चुकांतूनच तर माणूस शिकतो. आम्ही सर्रास माफ करतो. घोटाळ्यांनाही
चुका म्हणून त्यांचं वेटोळं करून फेकून देतो. जे आहे त्यात देशाप्रमाणे आम्हीही
खूष असतो. म्हणून बदलही घडत नाहीयेत. अजूनही पूल पडताहेत. मुला-मुलींचे अपहरण
होताहेत. पळणारे देशाबाहेर पळून जाताहेत.. त्यांना थांबवू शकणारे नंतर डिटेल इन्वेस्टीगेशन
करताहेत.... खटले चालताहेत... उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश रिपोर्ट तयार
करताहेत. नवीन पार्ट्या, नवीन लफडे, हकालपट्टी, स्वागत समारंभ अजूनही चालूच आहेत. त्यात
वृध्दाश्रम ही मागे नाहीत.. ते ही गजबजताहेत. दोन-चार दिवसांचे अर्भक सापडताहेत. साक्षरतेचं प्रमाणही तसंच आहे. न्यूज चॅनेल तेवढे भरमसाठ वाढताहेत.. कोरोना.. अगदी इटली, फ्रांस, अमेरिका पासून थेट आडगावापर्यंत लाईव्ह दाखवताहेत.. अधूनमधून दुष्काळ... आत्महत्या... निवडणुका...सतराशेसाठ संप... भावनांचे भूकंप... खुनी आहट... ‘अब हिंदुस्थान में घबराहट..’. कॅमेरामन टिम्ब-टिम्ब के साथ- रस्त्यावर फिरणाऱ्यांचा दाखवत मार.. मास्क लावूनही बोंबाबोंब फार... ' घाबऱ्या' आवाजात 'घाबरू नका'चा संदेश ही देऊ पाहतायत.. इकडे राम-लक्ष्मणाने लंका गाठली.. तिकडे कामाचं आता काय होईल म्हणून लोकांची विचारशक्ती आटली... तरीही ‘हम अभि लौटते हे’ म्हणत चॅनेल वर असंख्य चर्चा घडताहेत. प्रश्नांचा पार चोळामोळा होतोय; पण प्रश्न सुटायचे नाव नाही..
आम्ही तरुणही या कोरोनाग्रस्त भारताच्या गल्लीबोळात शांतपणे फिरत असतो. ऐरवी याच गल्लीबोळात आम्ही कधी गोंधळ घालतो, कधी गाड्या जाळतो, कधी कधी मोर्च्यांमध्येही आम्ही सामील होतो.. वेगवेगळे झेंडे धरतो.. 'समथिंग डिफरन्ट' म्हणून नेहमीच असलं काहीतरी 'थ्रिल' आम्हाला अनुभवायला आवडतं.. पण सामाजिक बांधीलकीशी आम्हाला काही एक देणं घेणं नसतं. आम्ही एकाच वेळी चार पाच प्रेमप्रकरणं सांभाळू शकतो; पण आई – बापाला मात्र आळीपाळीने सांभाळतो. आम्हाला शेजारच्याशी बोलायला 'टाईम' नसतो. आमचे मोबाईल सदासर्वदा कानाला लगडलेले असतात. काही कस्टमर केअरकडून नवीन 4G प्लॅन जाणून घेत असतात, तर बाकीचे प्लॅन अॅक्टिवेट करून मध्यरात्रीही विडिओ कॉल करून एकमेकांमध्ये मश्गुल असतात. मोजकेच काही आई-बाबांशी बोलत असतात अन् नेमकी त्यांचीच नेहमी नेटवर्क प्रॉब्लेमबद्दल बोंब असते. तीही फक्त आई-बाबांकडेच...
आमच्या उतरत्या शीटाच्या बाईक्स फक्त आमच्या गर्लफ्रेंडसाठीच असतात. त्यावर आजी, आजोबांना कधी बसवावं लागलं तर आम्हाला 'ऑक्वर्ड' वाटतं. मग अशावेळी अनोळखी रस्ते आम्ही प्रिफर करतो. बाईकला 'डिक्की लावण्याचा प्रकार' म्हणजे
आम्हाला कमीपणाचा वाटतो.. कॅपवर मस्तपैकी
फेरारीचा लोगो लावतो.. वडिलोपार्जित चालत आलेल्या गोष्टी आम्ही 'डिक्की' सारख्या काढून
फेकतो.. याला आम्ही आमचं ‘स्टेटस’ उंचावणं असं म्हणतो. फर्स्ट डे फर्स्ट शो बघणारे आम्ही
सारे ‘कमिने' च असतो...
आमचं शेड्युल्ड एंगेज असतं; पण म्हणून ‘स्वातंत्र्य दिन’, ‘प्रजासत्ताक दिन’ आम्ही विसरून जातो असं नाही. आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो असल्या दिवसांची.. आम्ही तेव्हाच फक्त आमची देशभक्ती
जगजाहीर करतो.. तेव्हा आम्ही न सांगताही आमचा डीपी धडाधड चेंज करतो.. फेसबुक कव्हर
फोटो तिरंगामय करतो.. व्हाट्सअँप स्टेटस वर ही 'ये मेरे वतन के लोगो' टाईप टिपिकल गाणे
ठेवतो.. असंख्य देशभक्तीपर विडिओ, मेसेजेस,
इमेजेस, अनिमेशन आम्ही धपाधप सर्वांना फॉरवर्ड करताच आमचाही उर भरून येतो... हळूहळू राष्ट्रभक्ती आमच्या थ्रू आमच्या मोबाईलमध्येही सेव्ह
होते.. मग नंतर दोन चार दिवसांनी सवडीने ‘तिला’ मोबाईल
सह आमच्यातूनही डिलीट करतो..
आम्ही मित्राशेजारी बसून फेसबुक वर मित्र शोधत असतो... ऐरवी आमच्या मोबाईलचे डेटा प्लॅन्स सदासर्वदा बदलत असतात... आमचं प्रेम आमच्या कृतीतून दिसतं. आम्ही कोपऱ्यात बसतो. गर्दीत असतो. मंदिरातही आम्ही भलतंच 'दर्शन' घेतो. आम्ही बोलतो... भेटतो...खेटतो... अगदी मदहोश होतो. आमचं खरं प्रेम शरीरावर असतं. हे आता आम्ही उघड उघड सांगतोही.
आम्ही मित्राशेजारी बसून फेसबुक वर मित्र शोधत असतो... ऐरवी आमच्या मोबाईलचे डेटा प्लॅन्स सदासर्वदा बदलत असतात... आमचं प्रेम आमच्या कृतीतून दिसतं. आम्ही कोपऱ्यात बसतो. गर्दीत असतो. मंदिरातही आम्ही भलतंच 'दर्शन' घेतो. आम्ही बोलतो... भेटतो...खेटतो... अगदी मदहोश होतो. आमचं खरं प्रेम शरीरावर असतं. हे आता आम्ही उघड उघड सांगतोही.
आता आता आम्ही 'सच का सामना' करायलाही शिकतोय. नातेसंबंध जपता जपता आम्ही नेटफ्लिक्स वरच्या
सिरीज ही 'उघड्या' डोळ्यांनी बघतो.. आणि कारण नसतांना 'क्या आपने अपने पत्नी को कभी शक की नजरसे देखा है..?' या प्रश्नापुढे कोलमडतो. त्यात 'कितने प्रतिशत लोग ये मानते है की लडकियाँ पहले लडकोंका प्रपोज करती है..?’ या बावळट प्रश्नांसाठी आम्ही विचारांना 'दम' लागेपर्यंत टीव्ही पाहतो.
एकूणच राष्ट्राची प्रगती होतेय... दिवसागणिक चॅनल वाढताहेत. शोज् वाढताहेत... बेरोजगारी, भ्रष्टाचार, बलात्कार एवढंच नाही तर फारकतीही वाढताहेत.... कॉलेजेस वाढताहेत... अॅडमिशनचे रेट वाढताहेत... शहरं वाढताहेत... गल्लीबोळ वाढताहेत...वकील, डॉक्टर्स, मेडिकलवाले हे तर नुसते संख्येनेच नाही तर शरीरानेही वाढताहेत... राजकीय पक्ष वाढताहेत... त्यांच्या सभा वाढताहेत... वाया गेलेली पोरं वाढताहेत... आहारी गेलेले माणसं वाढताहेत... आजार वाढताहेत... कोरोनाचे विषाणू वाढताहेत. एकमेकांना पाण्यात पाहणारे मनातले जीवाणू वाढताहेत... (महागाई वाढतेय हे पुन्हा सेपरेट सांगायला नको.) आणि सरकारी कचेऱ्यांमध्ये चकरा मारून मारून देशातले 'मुसद्दीलाल'सुद्धा वाढताहेत...
पण विशेष म्हणजे कुठूनही आरडाओरड ऐकायला येत नाही, मुळातच आमचा पिंडच तसा झालाय. एकंदरीत सगळे आनंदात आहेत. तेव्हा ‘विशिंग यू अ हॅपी डे.. ' असं वेगळं का म्हणावं..? तोच प्रश्न पडतोय..!!!
- अमोल जगताप

- अमोल जगताप





Sadhyachya paristhivar Marmik likhan...
ReplyDeleteThanks... stay home.. save nation..
DeleteStay home .....good 👍
ReplyDeleteTHNX
DeleteAmol Rangnath Jagtap 👍👍👍👍
ReplyDeleteVery nice, Amol
ReplyDeleteVery nice, Amol
ReplyDeleteThanks MK
Delete