Monday, April 20, 2020

काटकसर वडिलांची...




लहानपणी वडिलांशी गप्पा मारत असताना
घेऊन पाहयचो मी त्यांना गोडीत
अन् हळूच म्हणायचो..
आता घ्यावा लागेल मला नवा ड्रेस
सगळे कपडे आखूड झालेत
काही खांद्यावर, काही गुडघ्यावर विरलेत
काही तर कंबरेत वाढवूनही पक्के आव्वळ झालेत
वडील मग खटकन उठून.. कपाटामधली पावती काढून..
तावातावात बोलायचे पण जवळ ओढून..
हे बघ अजून, कपड्यांची उधारी बाकी आहे
घरपट्टी, पाणीपट्टी क्लिअर;
पण किराणावाला, दूधवाला केव्हाचे थांबून आहेत
त्यांना पैसे लावल्याशिवाय पोटाला  मिळणार नाही
पोटापेक्षा कपड्यांची तुला एवढी गरज आहे..??
अरे, आमच्या  काळात आम्ही तर
मॅट्रिकलाही फाटक्या चड्डीवर जायचो
कळकट, मळकट कपड्यांवरच
महिना-महिना काढायचो..
पायात कशाचा पत्ता नसायचा
डब्यात कधी भत्ता नसायचा
तरीही आम्ही जगलोच ना
इथंवर येऊन पोहोचलोच ना





मी मग चिडून..
हातपाय आदळून...
म्हणायचो त्यांना कळकळून...
हे तुमचं नेहमीचंच असतं
दरवेळी कारण सांगून
पैसे वाचवणं असतं
का तुमच्यासारखं आम्हालाही
काटकसरीने जगायला लावताय
रिक्षाऐवजी का उगाच बसने जायला सांगताय
वडील मग जवळ येऊन
डोक्यावरून हात फिरवून
म्हणायचे मला कवटाळून..
अजून लहान आहेस तू
बाप झाला की समजेल आपोआप
पगाराच्या पैशातून घर चालवणं
सण-वार, लग्न-कार्य अन् देणं-घेणं मिटवणं
मग तेव्हा तूच सांगशील मला
जरा काटकसरीने वागा..
कपडे-लत्ते, पैसे सोडून दुसरं काही मागा
बोलता बोलता त्यांचे डोळे भरून यायचे
ऐकता ऐकता माझे डोळे किलकिले व्हायचे
आणि बघता बघता आईलाही डोळे पुसावे लागायचे...

- अमोल रंगनाथ जगताप

21 comments:

  1. Now we are understanding.....why they are saiding this...excellent actually put all situation in word👌👌👌

    ReplyDelete
  2. खरच लहानपणीचे दिवस आठवले
    छान

    ReplyDelete
  3. Ekdam Masta amol dada ������

    ReplyDelete
  4. आज ही परिस्थितीशी लढणारा तो बाप माणूसच असतो...

    खूप छान... ( मयुर श. गांगुर्डे )

    ReplyDelete
  5. अमोलजी, डोळ्यांत पाणी आलं. माझे वडीलही अशिक्षित आहेत पण आम्हाला शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा नेहमी आटापिटा केला. मी त्यांना हे बोलून नाही दाखवू शकत पण त्यांनी जे केलं ते मनात सतत बोचत राहतं. कधी कधी इवल्याशा एखाद्या गोष्टीवरून आपलं नाही जमत त्यांच्याशी अशावेळी आपण हट्ट धरून बसतो अन ते सहज माघार घेतात. आपल्यासाठी दुसरं कोणी नाही करू शकत हे...आता ते थकलेत. कधी कधी हा सूर्य मावळतीला आल्याचा भास होतो अन एखाद्या कोपर्यात जावून एकट्याला रडावं लागतं. तुमच्या शब्दांनी आज हि वेगळी जाणीव व्यक्त करण्याची संधी दिली. राहवलं नाही म्हणून हे बोललो इथे. 'बाप झाल्यावर समजेल तुला' हे तुमच्या वडलांच वाक्य आता तुम्हाला अनुभवायलाही मिळत आहे. मी मात्र अजून त्याबाबतीत रिकामा आहे...पण तरीही मला आई बाबांना समजून घ्यायचंय...कारण ते आहेत तोपर्यंत मी माझं बालपण पुन्हा पुन्हा जगतोय...!

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा,तु जसा इथे व्यक्त झाला तसे वडीलांसमोरही व्यक्त झालात तर मला अजुन आनंद वाटेल.. माझ्यामुळे इतर कुणाच्याही नात्यातील विण जर अजुन घट्ट होत असेल... तर ते भाग्यच राहील माझं...

      Delete
  6. प्रिय अमोल
    खूप दिवसांनी तुझे लेखन वाचायला मिळाले .
    खूप आनंद झाला. दोन तीन वेळा वाचूनही समाधान होत नव्हते.तुझ्या लेखणीची ताकद आणि बाबांचे व तुझे नाते या दोन्ही बाबी खूपच जबरदस्त.....
    खूप खूप अप्रतिम लेखन.
    .....योगेश

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही.. ?
      घरच्यांचे संस्कार आणि तुमच्यासारखे मोलाचे आशीर्वाद पाठीशी असले की होता येत अस व्यक्त कधी.. तुमच्यासारखंच...

      Delete
  7. Your writing with an anecdotes creates an invisible picture in front of a reader and there is a reader's birth where he/she puts herself/himself in character's shoes and live the story...keep it up Buddy...

    ReplyDelete
  8. Apratim amol
    It's heart touching, very nice as you always

    ReplyDelete